आबुधाबी: सनरराझर्स हैदराबादने मंगळवारी या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली केली. हा सामना हैदराबादला जिंकवण्यात फिरकीपटू रशिद खानने महत्वाची जबाबादारी पार पाडली. त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले. पण यावेळी एक खेळाडू हैदराबादसाठी लकी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. नेमका हा खेळाडू आहे तरी कोण, पाहा…

दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी हैदराबादच्या संघात केन विल्यमसनला संधी देण्यात आली होती आणि तोच संघासाठी लकी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण यापूर्वी दोन्ही सामन्यांमध्ये केनला संधी देण्यात आली नव्हती. पण या सामन्यात केनला खेळवले आणि हादराबादने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएलच्या या हंगामात कालच्या सामन्यात पहिल्यांदाच मैदानात उतरला तो केन विल्यमसन. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या विल्यमसनने यावेळी दमदार फलंदाजीचा नमुना पेश केला. आतापर्यंत विल्यमसन कुठे होता, असा प्रश्न यावेळी चाहत्यांना पडला होता. कारण विल्यमसनने यावेळी चांगली फटकेबाजी करत चाहत्यांची मने जिंकली. यावेळी विल्यमसनने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जोरदार फटकेबाजी सुरु केली. विल्यमसनने यावेळी २६ चेंडूंत ४१ धावांची खेळी साकारली. हैदराबादचा युवा फलंदाज अब्दुल समदनेही यावेळी अखेरच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजी केली.

हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने यावेळी दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. हैदराबादने दिल्लीपुढे ठेवलेले १६३ धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. पण रशिद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे यावेळी हैदराबादला स्पर्धेतील पहिला विजय साकारता आला. त्याचबरोबर दिल्लीचाही या हंगामातील हा पहिला पराभव ठरला आहे. रशिद खानने यावेळी चार षटकांमध्ये फक्त १४ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.

दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि हैदराबादच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी यावेळी संघाला सावध सुरुवात करून दिली. पण स्थिरस्थावर झाल्यावर या दोघांनी चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली. वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी संघाला ७७ धावांची सलामी करून दिली. पण त्यानंतर केनची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here