भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी काही दिवसांपूर्वी विराट कोहलीबाबत एक टिप्पणी केली होती आणि त्यानंतर चांगलाच वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा गावस्कर यांनी कोहलीबाबत टिप्पणी केल्याचे पाहायला मिळत आहे. गावस्कर आता कोहललीबाबत नेमकं काय बोलले आहेत, पाहा…

काही दिवसांपूर्वी गावस्कर यांनी कोहलीबाबत एक टिप्पणी केली होती. त्यामध्ये गावस्कर यांनी कोहलीने लॉकडाऊनमध्ये पत्नी अनुष्का शर्माबरोबर सराव केला होता, असे म्हटले होते. त्यानंतर कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा गावस्कर यांच्यावर भडकली होती. गावस्कर यांनी प्रत्येकाचा आदर करायला हवा, अशी टीका अनुष्काने केली होती. त्यानंतर गावस्कर यांनी अनुष्काचे चांगलेच कान टोचल्याचे पाहायला मिळाले होते.

गावस्कर यांना क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ते बिनधास्तपणे समालोचनामधून आपली मते व्यक्त करत असतात. आता पुन्हा एकदा गावस्कर यांनी कोहलीबाबत एक टिपण्णी केली आहे. त्यामुळे गावस्कर-कोहली वादाचा दुसरा अंक पाहायला मिळणार का, असे चाहत्यांना वाटत आहे.

गावस्कर यांनी आता कोहलीबद्दल भविष्यवाणी करताना सांगितले की, ” आयपीएलच्या या हंगामात विराट कोहलीकडून आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. विराट हा कसा फलंदाज आहे हे मी सांगायला नको, सर्वांनाच ते माहिती आहे. सध्याच्या घडीला विराट धावा करताना दिसत नसला तरी यापुढे विराटच्या बॅटमधून चांगल्या धावा निघतील, अशी मला आशा आहे. विराट सध्या जास्त धावा करताना दिसत नसला तरी तो या हंगामात ४००-५०० धावा करेल, असे मला वाटते.”

गावस्कर यांनी पहिल्या टिपण्णीमध्ये कोहलीवर टीका केली होती. पण आता गावस्कर कोहलीबाबत सकारात्मक बोलताना दिसत आहे. पण कोहली या हंगामात ४००-५०० धावा करणार का आणि गावस्कर यांची भविष्यवाणी खरी ठरणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. पण यावेळी काही चाहत्यांनी गावस्कर यांच्यावर टीका केली आहे तर काहींनी समर्थन केले आहे. पण काही दिवसांतच गावस्कर यांची भविष्यवाणी खरी ठरणार की नाही, हे सर्वांना समजणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here