आबुधाबी, : सध्याच्या घडीला गुणतालिकेमध्ये राजस्थानचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण त्यांना धक्का द्यायला आता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सज्ज झालेला पाहायला मिळत आहे. जर राजस्थानला केकेआरने धक्का दिला तर त्यांचे स्थान नक्कीच धोक्यात येऊ शकते. पण जर राजस्थानने हा सामना जिंकला तर त्यांची विजयाची हॅट्रिक पाहण्याची संधी नक्कीच चाहत्यांना मिळेल.

आतापर्यंतच्या झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन यांची अर्धशतके आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. त्याचबरोबर राहुल तेवतियासारखा एक हुकमी एक्काही राजस्थानच्या संघाला गवसला आहे. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये जोफ्रा आर्चर आपली कमाल दाखवत असून त्याला अन्य गोलंदाजांचीही चांगली साथ मिळत आहे. त्यामुळे आता सलग तिसरा सामना जिंकून गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी राजस्थानचा संघ सज्ज झालेला पाहायला मिळत आहे.

केकेआरचा संघ आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. त्यामध्ये पहिल्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दुसऱ्या सामन्यात युवा सलामीवीर शुभमन गिलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला होता. केकेआरचा संघ सध्याचा घडीला गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जर हा सामना गमावला तर त्यांना आठव्य क्रमांकावर जावे लागेल. पण हा सामना जिंकला तर त्यांना गुणतालिकेत बढती मिळू शकते.

दोन्ही संघांचा विचार केला तर सध्याच्या घडीला केकेआरपेक्षा राजस्थानचे पारडे जड दिसत आहे. कारण आतापर्यंत त्यांनी दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले असेल. त्याचबरोबर संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली होत आहे. दुसरीकडे केकेआरच्या संघात वाद असल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. कर्णधार दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांच्यातील वाद अजूनही शमल्याचे पाहायला मिळत नाही. कारण अजून रसेलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे या गोष्टीचा फटका केकेआरला नक्कीच बसू शकतो, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here