आबुधाबी, : कोलकाता नाइट रायडर्सचा संघ या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. पण राजस्थानच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत केकेआरच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम केले. एकेकाळी केकेआर दोनशे धावांचा पल्ला गाठू शकतो, असे वाटत होते. पण केकेआरला यावेळी राजस्थानपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवता आले.

राजस्थानने यावेळी नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. केकेआरला यावेळी चांगली सुरुवात करता आली नाही. कारण त्यांना सलामीवीर सुनील नरिलच्या (१५) रुपात पहिला धक्का बसला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने नरिनला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. नरिन बाद झाल्यावर एकाबाजूने युवा सलामीवीर शुभमन गिल दमदार फलंदाजी करत होता.

नरिन बाद झाल्यावर काही काळ गिल आणि नितिश राणा यांच्यामध्ये थोडी भागीदारी पाहायला मिळाली. पण राणा २२ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. आता गुलवर संघाची भिस्त होती. कारण गिल चांगलाच स्थिरस्थावर झालेला होता. पण राणा आऊट झाल्यावर काही वेळातच गिलही बाद झाला. गिलने ३४ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावरर ४७ धावा केल्या.

गिल बाद झाल्यावर कर्णधार दिनेश कार्तिक हा फलंदाजीला आला. पण कार्तिकला यावेळी फक्त एकाच धावेवर समाधान मानावे लागले. दिनेश बाद झाल्यावर आंद्रे रसेलने काही काळ धडाकेबाज फलंदाजी केली, पण रसेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रसेलने यावेळी १४ चेंडूंत तीन षटकाराच्या जोरावर २४ धावा केल्या.

राजस्थानकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने यावेळी भेदक गोलंदाजीचा नमुना पेश केला. आपल्या चार षटकांमध्ये १८ धावा देत जोफ्राने दोन विकेट्सही मिळवल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here