वाचा-
किंग्ज इलेव्हन पंजाबला दोन सामने अटीतटीच्या लढतीत गमवावे लागले. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शॉर्टरन वाद झाल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. तर राजस्थानविरुद्ध २२३ धावा केल्यानंतर देखील त्यांनी सामना गमवला. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाने देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये सामना गमवला होता.
वाचा-
गुणकत्त्याचा विचार केल्यास पंजाब ३ सामन्यात १ विजय २ पराभवासह दोन गुण आणि +१.४९८ सरासरीसह पाचव्या तर मुंबई इंडियन्स ३ सामन्यात १ विजय दोन पराभवासह दोन गुण आणि + ०.६५४ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ विजय मिळवून गुणतक्त्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. या दोन्ही संघांनी त्यांची याआधीची लढत गमावली आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई
१) चेन्नईविरुद्ध पराभव
२) कोलकाताविरुद्ध विजय
३) बेंगळुरूविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव
आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब१) दिल्लीविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव
२) चेन्नईविरुद्ध विजय
३) राजस्थानविरुद्ध पराभव
वाचा-
असा असेल मुंबईचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सुर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणार पंड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रित बुमराह
असा असेल किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ
केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकिपर), मयांक अग्रवाल, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, जेम्स निशम, सरफराज खान, रवी बिश्नोई, मुर्गन अश्विन, शेल्डन कॉर्टेल, मोहम्मद शमी.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times