नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम युएईमध्ये सुरू आहे. करोना काळात होणारी ही स्पर्धा अनेक कठोर नियमांद्वारे आयोजित केली जात आहे. करोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) काही नवे नियम तयार केले आहेत. अशाच एका नियमाचे भारतीय खेळाडूने उल्लंघन केले.

वाचा-
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने आयसीसीने कोरना व्हायरस संदर्भातील नियमाचे उल्लंघन केले. सामना सुरू असताना तिसऱ्या षटकात उथप्पाने सुनील नरेनचा कॅच सोडला. त्यानंतर त्याने चेंडू घेत त्यावल थुंकी लावली. उथप्पाने केलेल्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-
यासंदर्भात अद्याप आयपीएलकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आले नाही. आयसीसीने या वर्षी जून महिन्यात चेंडूवर थुंकी लावण्यासाठी बंदी घेतली होती. थुंकी लावण्यामुळे कोरना व्हायरस पसरण्याचा धोका होऊ शकतो म्हणून हा नियम लागू करण्यात आला आहे.

वाचा-

आयसीसीच्या नियमानुसार जर खेळाडूने चेंडूवर थुंकी लावली तर सुरुवातीला अंपायर्सनी संबंधीत संघाला अलर्ट करावे. पण एका संघाने डावात दोन वेळा असे केले तर विरुद्ध संघाच्या धावसंख्येत पाच धावा जोडल्या जातील. तसेच जर खेळाडूने चेंडूला थुंकी लावली तर अंपायरला चेंडू साफ करावा लागतो.

वाचा-

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला १७५ धावांचे टार्गेट देण्यात आले होते. पण त्यांचा ३७ धावांनी पराभव झाला. दरम्यान चेंडूला थुंकी लावल्याबद्दल उथप्पाने माफी मागितली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here