नवी दिल्ली: rr vs kkr मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने संघाचा विजय रथ रोखला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाताने ३७ धावांनी विजय मिळवला. हा सामना सुरू होण्याआधीच विजय कोणाचा होणार हे ठरले होते. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण…

वाचा-
राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करून विजय मिळवला होता. हे दोन्ही सामने शारजामध्ये झाले होते. पण अबुधाबीत झालेल्या सामन्यात राजस्थानला १७५ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. २० षटकात त्यांना ९ बाद १३७ धावा करता आल्या.

वाचा-
आयपीएलमध्ये आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या सर्व सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. दुबईत आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या सर्व संघांनी विजय मिळवला. या मैदानाचा हा इतिहास असताना देखील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक धक्कादायक निर्णय घेतला.

वाचा-

स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले. कारण या सामन्याआधी झालेल्या पाच सामन्यात प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकले होते आणि सहाव्या सामन्यात देखील तेच झाले.

वाचा-

या सामन्यात स्मिथने दुबईतील यावेळीच्या या रेकॉर्डकडे दुर्लक्ष केले. त्याचा निर्णय चुकला. याआधी शारजा मैदानावर त्याने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तेव्हा राजस्थानने २२३ धावांचा डोंगर पार केला होता.

दुबईतील सहा सामन्याचा निकाल
१] दिल्ली विरुद्ध पंजाब- दिल्लीने टॉस जिंकला आणि सुपर ओव्हरमध्ये विजय
२] बेंगळुरू विरुद्ध हैदराबाद- हैदराबादने नाणेफेक जिंकली, पण सामना १० धावांनी गमवला
३] बेंगळुरू विरुद्ध पंजाब- बेंगळूरूने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामन्यात ९७ धावांनी पराभव झाला
४] दिल्ली विरुद्ध चेन्नई- चेन्नईने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामना ४४ धावांनी गमवला
५] बेंगळुरू विरुद्ध मुंबई- मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि बेंगळुरूने सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला
६] राजस्थान विरुद्ध कोलकाता- राजस्थानने टॉस जिंकून गोलंदाजी केली आणि सामना ३७ धावांनी गमवला

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here