नवी दिल्ली: आयपीएल मध्ये गुरुवार झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. मुंबईने आतापर्यंत ४ सामन्यात दोन विजय आणि दोन पराभवासह ४ गुण मिळवले आहेत. मुंबईचा नेट रनरेट +१.०९४ इतका आहे.

वाचा-

वाचा-

गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजीकरत १९१ धावा केल्या होत्या. बदल्यात पंजाबला २० षटकात ८ बाद १४३ धावा करता आल्या. मुंबईने ४८ धावांनी विजय मिळवला. या सामन्याआधी मुंबई गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर होता. पण सामना झाल्यानंतर थेट ते पहिल्या स्थानावर पोहोचले. गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स ३ सामन्यात २ विजयासह आणि +०.४८३ रनरेटसह दुसऱ्या, कोलकाता नाइट रायडर्स २ गुण आणि +०.११७ रनरेटसह तिसऱ्या तर राजस्थान रॉयल्स -०.२१९ रन रेटसह चौथ्या स्थानावर आहे.

वाचा-

वाचा-
गुणतक्त्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पाचव्या, सहाव्या, सनरायजर्स हैदराबाद सातव्या तर तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवणारा धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ अखेरच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here