गेल्या सामन्यात हैदराबादने या हंगामातील पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे हैदराबादच्या संघाने मनोबल चांगलेच उंचावलेले असेल. गेल्या सामन्यात हैदराबादच्या संघात केन विल्यम्सन आला होता. त्यामुळे हैदराबादची फलंदाजी अधिक भक्कम झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो संघाला कशी सलामी करून देतात, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
चेन्नईच्या संघाने या आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना सलग दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे त्यांचा संघ आठव्या स्थानावर आहे. आतापर्यंत धोनीला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्याचबरोबर चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना आतापर्यंत सूर गवसल्याचे पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे चेन्नईचा संघ या सामन्यात सलामीच्या जोडीत बदल करण्याची शक्यता आहे. हा सामना जर चेन्नईला जिंकायचा असेल तर त्यांना संघात नक्कीच काही बदल करावे लागतील. त्यामुळे हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी चेन्नईच्या संघात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यात त्यांना जर पराभव पत्करावा लागला तर त्यांची आठव्या स्थानावर घसरण होऊ शकते. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात फलंदाजीबरोबर हैदराबादची गोलंदाजी नेमकी कशी होते, हे पाहावे लागेल. गेल्या सामन्यात फिरकीपटू रशिद खानने चमक दाखवली होती. त्यामुळेच हैदराबादला विजय मिळवता आला होता. त्यामुळे या सामन्यात रशिदकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. त्याचबरोबर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघात कोणाला स्थान मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times