हैदराबादच्या संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हैदराबादला यावेळी पहिल्याच षटकात धक्का बसला. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहारने यावेळी पहिल्याच षटकात हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोला बाद केले. त्यामुळे हैदराबादला यावेळी चांगली सलामी देता आली नाही.
जॉनी बाद झाल्यावर काही वेळ कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांची जोडी जमली. पण चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मनीषला बाद केले आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला. पांडे बाद झाल्यावर वॉर्नर आणि केन विल्यम्सन ही अनुभवी जोडी मैदानात होती. हैदराबादला या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण या जोडीला मोठी भागीदारी उभारता आली नाही.
पीयुष चावलाला मोठा फटका मारण्याच्या नादात वॉर्नर आऊट झाला, त्याला २८ धावा करता आल्या. वॉर्नर बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी केनवर आली होती. पण वॉर्नर बाद झाल्यावर दुसऱ्याच चेंडूवर केनही आऊट झाला. केनने यावेळी धावचीत होत आत्मघात केला. हे दोघेही बाद झाल्यावर हैदराबाद मोठी धावसंख्या उभारणार नाही, असे वाटत होते. पण यावेळी हैदराबादच्या युवा खेळाडूंनी संघाला आधार दिला.
प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी यावेळी हैदराबादचा सावरले. त्याचबरोबर हैदराबादला वॉर्नर आणि केन बाद झाल्यावर सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. अभिषेक शर्माने यावेळी ३१ धावांची खेळी साकारली, त्या चहरने धोनीकरवी झेलबाद केला. पण अभिषेक बाद झाल्यावरही गर्गने धडाकेबाज फलंदाजी सुरुच ठेवली. त्याचबरोबर
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times