दुबई: IPL 2020 आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा () पराभव केला. चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. आतापर्यंत चेन्नईने ४ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. या पराभवानंतर कर्णधार (M S Dhoni) ला निराशा लपवता आली नाही.

वाचा-
हैदराबादविरुद्ध सात धावांनी पराभव झाल्यानंतर धोनी म्हणाला, संघातील खेळाडू पुन्हा पुन्हा त्याच चुका करत आहेत. तुम्ही जर कॅच सोडला तर मॅच जिंकता येणार नाही. चेन्नईने हैदराबादविरुद्ध खराब फिल्डिंग केली. अभिषेक शर्माला दोन वेळा जीवनदान मिळाले. त्याने प्रियम गर्गसोबत ७७ धावांची भागिदारी केली. यामुळे हैदराबादला ५ बाद १६४ पर्यंत मजल मारता आली.

वाचा-
या सामन्यात धोनीने नाबाद ४७ धावा केल्या. तो म्हणाला, मी अनेक चेंडू मुक्तपणे खेळू शकलो नाही. कदाचित मी अधिक प्रयत्न करत होतो. मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण उष्णतेमुळे गळा सारखा सुखतोय.

वाचा-

कदाचीत सलग तीन सामन्यात आमचा पराभव याआधी कधीच झाला नसले. चुका सुधारण्याची गरज आहे. पुन्हा पुन्हा एकच चुक करू शकत नाही. कॅच सोडने, नो बॉल या चुका होत आहेत. आम्ही यापेक्षा चांगले खेळू शकतो. जर ही नॉकआउट मॅच असती तर कॅच सोडने किती महाग पडले असते, असे धोनी म्हणाला.

व्हिडिओ पाहण्यासाठी करा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here