वाचा-
हैदराबादविरुद्ध चेन्नईकडून ५ षटकार मारले गेले. त्यापैकी रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी दोन तर धोनीने एक मारला. या पाच षटकारांसह त्यांचे आयपीएलमध्ये एक हजार २ षटकार झालेत. चेन्नईसह किंग्ज इलेव्हन पंजाबने देखील इतकेच षटकार मारले आहेत. हे दोन्ही संघ एकाच स्थानावर आहेत.
वाचा-
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या नावावर आहे. त्यांनी आतापर्यंत १ हजार १४७ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने १ हजार १३४ षटकार मारले आहेत. चेन्नई आणि पंजाब एक हजार २ षटकारांसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर तर कोलकाता ९४८ षटकारांसह चौथ्या, ९०० षटकारांसह दिल्ली पाचव्या तर ५४४ षटकारांसह हैदराबाद अखेरच्या स्थानावर आहे.
वाचा-
IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे संघ
RCB- १ हजार १४७
MI- १ हजार १३४
CSK- १ हजार ००२
KXIP-१ हजार ००२
KKR- ९४८
DC- ९००
RR- ७२२
SRH- ५४४
ही आकडेवारी आयपीएलच्या १३व्या हंगामातील १४व्या सामन्यापर्यंतची आहे. स्पर्धेत या वर्षी अनेक सामने होणार आहेत. त्यामुळे त्याच बदल होण्याची शक्यता आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times