दुबई: आयपीएलच्या आज होणाऱ्या डबल हेडरमध्ये आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक पराभव आणि दोन विजय मिळवले आहेत. त्यामुळे हा सामना दोघांसाठी महत्त्वाचा आहे. बेंगळुरुविरुद्धच्या सामन्याआधी राजस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

वाचा-
आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा ऑल राउंडर दुबईत दाखल होणार आहे. यामुळे राजस्थानला हत्तीचे बळ मिळणार आहे. स्टोक्स शनिवारी रात्री दुबईत पोहोचणार आहे. अर्थात त्याला लगेच सामने खेळता येणार नाही. करोना व्हायरसमुळे त्याला काही दिवस क्वारंटाइन व्हावे लागले.

वाचा- अपडेट

स्टोक्सचे वडील आजारी असल्यामुळे तो स्पर्धेत पहिले काही दिवस उपलब्ध नव्हता. आता त्याने दुबईत येत असल्याचे सांगितले आहे.

वाचा-

करोना प्रोटोकॉलमुळे स्टोक्सला काही लगेच सामने खेळता येणार नाही. पण त्याच्या येण्याच्या बातमीने राजस्थान संघाला नक्कीच आनंद झाला असेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ३६ तासांचा क्वारंटाइन कालावधी निश्चित केला आहे. जो सामान्य परिस्थितीत ६ दिवसांचा होता. युएईमध्ये दाखल झाल्यानंतर खेळाडूंची तीन वेळा करोना चाचणी होते. या तीन ही चाचण्या नेगेटिव्ह आल्यानंतर संघासोबत सराव करता येतो.

वाचा-

स्टोक्सच्या येण्याने राजस्थानचा मोठा फायदा होणार आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतो. सध्या राजस्थानची मधली फळी थोडी कमकुवत दिसत आहे. रॉबिन उथप्पा आणि रियान पराग ही कमतरता पूर्ण करताना दिसत नाहीत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here