वडिल शाळेची बस चालवायचे. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. वयाच्या ११ वर्षी त्याने आईला गमावले, तिचे निधन झाले. पण आईचे स्वप्न होते, त्याने क्रिकेटपटू व्हावे. त्यामुळे ते स्वप्न त्याने उराशी बाळगले. एकेकाळी त्याच्याकडे बॅट घ्यायलाही पैसे नव्हते. पण सध्याच्या घडीला तो आयपीएलमधला हिरो ठरला आहे. ही गोष्ट आहे शुक्रवारच्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या प्रियम गर्गची.

शुक्रवारी हैदराबादचे सर्व अनुभवी फलंदाज बाद झाले तेव्हा प्रियम गर्ग नावाचा हा युवा खेळाडू मैदानात उतरला आणि आपल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर त्याने संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात प्रियमने फक्त २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी साकारली होती. त्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. यापूर्वी प्रियमने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले आहे. पण प्रियमची ही वाटचाल संघर्षपूर्ण राहिलेली आहे.

प्रियमने आपल्या आईला २०११ सालीच गमावले. त्यानंतर घरामध्ये वडिल, पाच भाऊ आणि एक बहिण, असे कुटुंब होते. वडिल शाळेची बस चालवायचे, त्यामुळे त्यांच्या पगारामध्ये घराचा खर्च कसाबसा भागायचा. त्यामुळे प्रियमकडे एकेकाळी बॅट विकत घ्यायलाही पैसे नव्हते. त्यावेळी त्याच्या वडिलांनी एका मित्राकडून काही पैसे उधारीवर घेतले आणि प्रियमला क्रिकेटची किट आणून दिली. प्रियम चांगले क्रिकेट खेळायचा, त्यामुळे वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि आज संपूर्ण जगाला प्रियम नावाचा हिरा आयपीएलमध्ये चमकताना दिसला आहे.

उत्तर प्रदेश येथील मेरठमध्ये प्रियम राहतो. आपल्या आईचे स्वप्न काही करून साकार करायचे, हे त्याने ठरवले. त्यामुळे अभ्यासाबरोबर तो ७-८ तास क्रिकेटचा सरावही करायचा. वयाच्या सहाव्या वर्षापासून प्रियम क्रिकेट खेळायला लागला. त्याची क्रिकेटमधील आवड आणि गुणवत्ता पाहून त्याला वडिलांनी कोचिंग कॅम्पमध्येही पाठवले. त्यानंतर मात्र प्रियमची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. प्रियमची कामगिरी पाहून त्याला २०१८ साली उत्तर प्रदेशच्या रणजी संघात स्थान देण्यात आले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here