वाचा-
सामना झाल्यानंतर धोनीने चेंडू बॅटच्या मध्यभागी येत नसल्याचे सांगितले. त्याने ३६ चेंडूत ४७ धावा केल्या. चेन्नईला १६५ धावसंख्या करता आली नाही. त्याचा हा सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यानंतर धोनीच्या फिटनेसवर सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनी जुलै २०१९ नंतर क्रिकेट खेळत आहे त्यामुळे असे होत असावे असे काही जण म्हणत आहेत.
वाचा-
यावर भारताचा माजी जलद गोलंदाज इरफान पठाणने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. पठाणने या पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख केला नाही. पण त्याचा इशारा धोनीकडे असल्याची चर्चा आहे.
वाचा-
काही लोकांसाठी वय हा फक्त आकडा असतो. बाकीच्या लोकांसाठी संघातून बाहेर काढण्याचे कारण…, असे ट्विट इरफान पठाणने केले आहे. पठाण २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०१३चा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयी संघात होता. धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने अनेक सामने खेळले आहेत. तो चेन्नई आणि पुणे संघाकडून देखील खेळला आहे.
वाचा-
गेल्या हंगामात धोनीने चेन्नईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण या वर्षी अद्याप धोनीला धावा करता आल्या नाहीत. राजस्थानविरुद्ध धोनीने १७ चेंडूत २९ धावा केल्या होत्या. हैदराबादविरुद्ध जेव्हा धोनी मैदानावर आला तेव्हा १४ शिल्लक होत्या. त्यानंतर धोनीने ३६ चेंडूत ४७ धावा केल्या.
वाचा-
पठाणने याआधी देखील साधला होता निशाणा
इरफान पठाणने याआधी २०१२च्या श्रीलंकेच्या दौऱ्याचा उल्लेख केला होता. लंकेविरुद्ध चांगली कामगिरी केली होती तरी देखील त्यानंतर झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत मला एकाही सामन्यात संधी दिली नाही. यासंदर्भात मी कोच गॅरी कस्टनकडे विचारणा केली तर ते म्हणाले की, काही गोष्टी माझ्या हातात नाहीत.
इरफानने २००८ साली धोनीकडे विचारणा केली होती. तर धोनीने सर्व काही ठीक सुरु असल्याचे सांगितले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times