आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात कोहलीने दमदार कामगिरी केली. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूला जे जमले नाही, ते कोहलीने केल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोहलीने आतापर्यंत आपल्या टीकाकारांना बॅटनेच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही त्याने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. त्याचबरोबर आरसीबीच्या संघाने या आयपीएलमधील तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये कोहीने एक विक्रम रचल्याचेही पुढे आले आहे.

राजस्थानविरुद्धच्या आजच्या सामन्यात कोहलीने ५३ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर कोहलीने आयपीएलमध्ये ५,५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकाही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आता कोहलीच्या नावावर जमा झालेला आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यांमध्ये कोहलीवर टीका झाली होती. आता कोहलीने आपल्या धावांच्या जोरावरच त्यांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोहलीच्या आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये ५५०२ धावा झालेल्या आहेत. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८१ सामने खेळले आहेत, ज्यापैकी १७३ डावांमध्ये त्याने फलंदाजी केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत २७ वेळा तो नाबाद राहिलेला आहे. आयपीएलमध्ये विराटची सरासरी ही ३७.६८ असून स्ट्राइकरेट १३१.१९ एवढा आहे. आज फटकावलेल्या नाबाद ७२ धावांमुळे कोहलीला हा विक्रम आजच्याच सामन्यात करता आलेला आहे. कारण यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांमध्ये कोहलीला जास्त धावा करता आल्या नव्हत्या. या सामन्यातील धडाकेबाज फलंदाजीमुळे कोहली आता फॉर्मात आला असून तो आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झाल्याचे म्हटले जात आहे.

युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि कर्णधार
(ViratKohli) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ८ विकेटनी (
Royals by 8 wickets ) पराभव केला. RCBचा हा सलग दुसरा विजय ठरला आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ६ बाद १५४ धावा केल्या. विजयाचे लक्ष्य बेंगळुरूने सहज पार केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here