नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यानंतर गुणतक्त्यात मोठा उलटफेर झाला. अर्थात आज दोन सामने होणार असल्याने पुन्हा रात्री १२ नंतर गुणतक्त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज झालेल्या पहिल्या सामन्यात () ने राजस्थान रॉयल्सचा () ८ विकेटनी विजय मिळवला. या सामन्यात देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal ) आणि कर्णधार (ViratKohli) यांनी अर्धशतकी खेळी केली आणि विजय मिळून दिला.
वाचा-
RCB चा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी मुंबईचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. आजच्या विजयासह विराटच्या संघाने गुणतक्त्यात ६ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. पण त्यांच्यासाठी काळजीचा विषय म्हणजे नेट रनरेट होय. बेंगळुरूचे नेट रनरेट -०.९५४ इतके आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स असून त्यांच्याकडे ४ गुण आणि +१.०९४ इतके नेट रनरेट आहे. दिल्ली तिसऱ्या स्थानावर, कोलकाता चौथ्या, हैदराबाद पाचव्या, राजस्थान सहाव्या, पंजाब सातव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर आहे.
वाचा-
वाचा-
…
सध्या दिल्ली आणि कोलकाता यांचा सामना सुरू आहे. यातील जो संघ विजय मिळवेल तो पुन्हा गुणतक्त्यात फेरबदल करेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times