अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज डबल हेडर स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू () यांच्यात सामना झाला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत १५४ धावा केल्या. या सामन्यात एक असा क्षण आला जेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला…

वाचा-
राजस्थानच्या डावात बेंगळुरूकडून अखेरची ओव्हर टाकत होता. पहिल्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने एक धाव काढली. त्यानंतर दुसरा चेंडू खेळण्यास आला. सैनीचा फुलटॉस चेंडू जो १४० किलो मीटर वेगाने टाकला होता, तो तेवतियाच्या छातीला लागला. तेवतियाचा चेंडू मारताना शॉट चुकला आणि तो छातीला लागला.

वाचा-
चेंडू लागल्या लागल्या राहुल बॅट सोडून जमिनीवर बसला. तातडीने डगआउटमधून फिजिओ मैदानावर धावत आले. काही वेळात राहुल तेवतिया पुन्हा फलंदाजीसाठी उभा राहिला. या काळात सैनी देखील तेथे उभा होता. त्याने तेवतियाची चौकशी केली.

वाचा-

वाचा-
अंपायरनी सैनीचा चेंडू नो बॉल दिला आणि पुढच्या चेंडूवर तेवतियाने षटकार मारला. त्यानंतर पुन्हा एक षटकार मारत त्याने जोरदार कमबॅक केले.

वाचा-
राहुल तेवतियाने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात ५ षटकार मारले होते. तेव्हा राजस्थानने २२३ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here