केकेआरने यावेळी नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या सलामीवीरांनी या गोष्टींचा चांगलाच फायदा उचलला. कारण आतापर्यंत दिल्लीला मोठी सलामी पाहायला मिळाली नव्हती. पण पृथ्वी साव आणि शिखर धवन यांनी यावेळी ५६ धावांची सलामी दिली. पण धवन आऊट झाला आणि ही जोडी फुटली. धवनने यावेळी १६ चेंडूंत २६ धावा केल्या. धवनाला यावेळी युवा गोलंदाज वरुण चक्रवर्तीने इऑन मॉर्गनकरवी झेलबाद केले.
धवन आऊट झाल्यावरही पृथ्वीची धडाकेबाज फलंदाजी सुरु होती. पृथ्वीने यावेळी हंगामातील पहिले अर्धशतकही पूर्ण केले. कमलेश नागरकोटीने यावेळी पृथ्वीला बाद करत केकेआरला मोठे यश मिळवून दिले. पृथ्वीने यावेळी ४१ चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. पृथ्वी बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या खांद्यावर घेतली.
पृथ्वी बाद झाल्यावर श्रेयसने जलदगतीने धावा जमवल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी श्रेयसला रिषभ पंतची साथ मिळाली. पंत यावेळी मोठी खेळी साकारू शकला नसला तरी त्याने धावांची गती चांगलीच वाढवल्याचे पाहायला मिळाले. पंतने यावेळी १७ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times