दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामातील गुणतक्ता पाहिल्यानंतर सर्वांना काही तरी चुकल्या सारखे वाटत आहे. कारण महेंद्र सिंह धोनीचा हा संघ सर्वात ताळाला आहे. चेन्नईने ४ पैकी ३ सामने गमावले आहेत तर फक्त एकात विजय मिळवलाय. त्यामुळे आजची लढत त्यांच्यासाठी हायव्होल्टेज आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर चेन्नईची लढत किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध () रात्री ७.३० वाजता होणार आहे.

वाचा-
या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर त्यांच्यासाठी काहीच बरोबर झाले नाही. आयपीएलमधील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता चेन्नई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत २१ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १२ चेन्नईने तर ९ पंजाबने जिंकल्या आहेत. २०१० मधील एक सामना टाय झाला होता आणि सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली होती.

वाचा-

चांगले खेळाडू असून….
CSK संघात चांगले खेळाडू असून त्यांची कामगिरी समाधानकारक होताना दिसत नाही. शुक्रवारी सहा दिवसांच्या गॅपनंतर हैदराबादविरुद्ध चेन्नईने संघात तीन बदल केले होते. अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो हे दोन खेळाडू संघात असताना देखील विजय मिळवता आला नाही. आतापर्यंत फाफ डुप्लेसिस वगळता अन्य कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि चेन्नईला फिल्डिंग, गोलंदाजी आणि फलंदाजी या सर्वच क्षेत्रात एकाच वेळी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

वाचा-
संघ जेव्हा विजय मिळवतो तेव्हा सर्व चुका झाकल्या जातात. पण जेव्हा पराभव होतो तेव्हा याच्या उलट होते. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर धोनी म्हणाला होता की, आम्ही मोठ्या कालावधीनंतर सलग तीन सामने गमावले आहेत. यापुढे आम्हाला प्रत्येक गोष्ट चांगली करावी लागणार आहे. हा एक प्रोफेशनल अॅप्रोच असतो. कॅच न सोडणे, नो बॉल न टाकणे या गोष्टींवर नियंत्रण हवे. कदाचीत आम्ही जास्त रिलॅक्स होत आहोत.

पंजाबचा संघ शानदार फॉममध्ये…

किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सध्या शानदार कामगिरी करत आहे. कर्णधार केएल राहुल, मयांक अग्रवाल दोघांनी मोठी धावसंख्या उभी केली आहे. आतापर्यंत पंजाबने दोन वेला २०० धावा केल्या आहेत. असे असेल तरी पंजाबने गोलंदाजीच्या मर्यादेमुळे ३ सामने गमावले आहेत. चांगली कामगिरी करून देखील पंजाबचा संघ गुणतक्त्यात चेन्नईच्यावर म्हणजे सातव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नाहीत. चेन्नईला नेमक्या याच गोष्टीचा फायदा घ्यावा लागेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here