वाचा-
मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांकडे स्फोटक फलंदाज आहेत. कालच शनिवारी या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने २२८ तर कोलकाताने २१० धावा केल्या होत्या. भारतीय वेळेनुसार मुंबई-हैदराबाद यांची लढत दुपारी ३.३० वाजता होणार आहे.
वाचा-
हैदराबादविरुद्ध सध्या मुंबईचे पारडे जड वाटत असेल तरी दोन्ही संघात आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे लढत कोण सर्वाधिक धावा करते त्याची असेल. हैदराबादसाठी काळजीचे कारण म्हणजे त्यांचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे. तो कदाचित या सामन्यात खेळणार नाही.
काय सांगते आकडेवारी…
आयपीएलमध्ये या दोन्ही संघात आतापर्यंत १४ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ७ मुंबईने तर ७ हैदराबादने जिंकल्या आहेत. या दोन्ही संघात एक लढत सुपर ओव्हरमध्ये झाली होती जी मुंबईने जिंकली आहे.
वाचा-
गेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यानंतर किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी अखेरच्या ५ षटकात ८९ धावा केल्या होत्या. आज तर शारजावर सामना होत आहे. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंनी या मैदानावर २५० पर्यंत धावा केल्या तर आश्चर्य वाटू नये. दुबई आणि अबुधाबी या दोन मैदानापेक्षा शारजाची सीमारेषा जवळ आहे. रोहित शर्मा लय मध्ये असून त्याने चार सामन्यात १७० धावा केल्या आहेत. मुंबईसाठी सलामीचा फलंदाज क्विंटन डीकॉक आणि सुर्यकुमार यादव या दोघांची फलंदाजी थोडी काळजीचा विषय आहे. मधल्याफळीत इशान किशन, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड हे सध्या चांगल्या फॉममध्ये आहेत. गोलंदाजी देखील मुंबईसाठी फार काळजीचा विषय नाही. जलद गोलंदाजांना राहुल चाहर, क्रुणाल पंड्या यांची चांगली साथ मिळत आहे.
वाचा-
आत्मविश्वास वाढला
चेन्नईविरुद्ध विजय मिळवल्याने हैदराबादचा आत्मविश्वास वाढला आहे. संघातील युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे सिनिअर खेळाडूंवरील तणाव कमी झाला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे आणि केन विलियमसन ही आघाडीची फळी मजबूत आहे. त्यानंतर अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग आणि अब्दुल समद सारखे खेळाडू आहेत. गोलंदाजीत आज भुवनेश्वर खेळला नाही तर कोणाला संधी मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times