ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पंतच्या ऐवजी केएल राहुल विकेटकीपिंग करत होता. फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने टाकलेला चेंडू पंतच्या डोक्याला लागला.
वाचा-
कमिन्सने टाकलेला बाऊंसर चेंडू पंतच्या हेल्मेटला लागला आणि तो बाद झाला. पंतला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रात्रभर त्याच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट घेतली जात असल्याचे बीसीसीआयने बुधवारी सकाळी सांगितले. पंतच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट दिले जातील, असे देखील बोर्डाने म्हटले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे १७ जानेवारी रोजी राजकोट येथे होणार आहे. दुसऱ्या सामन्यात खेळायचे असेल तर पंतला दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी अतिशय कमी कालावधी आहे.
वाचा- ऑस्ट्रेलिया संघाने यजमान भारतीय संघाचा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १० विकेटनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात डेव्हिड वॉर्नरने ११२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२८ धावा केल्या. तर कर्णधार अॅरॉन फिंचने ११४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी २५६ धावांचे लक्ष्य पार केले. एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७४ चेंडूत आणि १० विकेट राखून विजय मिळवला.
वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News
Thank you very much for sharing such a useful article. Will definitely saved and revisit your site
okbet mobile app