चेन्नईच्या संघाकडून महाराष्ट्राचा अजिंक्य रहाणे आणि ख्रिस गेल खेळू शकतात, अशी माहिती मिळत आहे. तुम्हाला ही गोष्ट वाचून धक्का बसेल. पण सध्याच्या घडीला आयपीएलमधील नवीन नियमांमुळे हे बदल होऊ शकतात, असे दिसत आहे.

अजिंक्य हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. पण या हंगामाच्या लिलावाच्यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अजिंक्यला आपल्या संघात स्थान दिले. त्यामुळे दिल्लीकडून अजिंक्य आणि शिखर धवन हे दोघे सलामीला येतील, असे वाटत होते. पण आतापर्यंत धवन आणि पृथ्वी साव हे दोघे सलामीला येत आहेत. त्यामुळे अजिंक्यला आतापर्यंत दिल्लीकडून एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही.

दुसरीकडे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल हा किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात आहे. पण पंजाबच्या संघाकडून लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल हे दोघे चांगली सलामी करताना दिसत आहे. दोघांच्या नावावर शतकंही आहेत. त्यामुळे गेलला आतापर्यंत पंजाबकडून एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही.

आयपीएलचा नवा नियम काय सांगतोआयपीएलमध्ये यावर्षी खेळाडूंच्या देवाण-घेवाणीबद्दल नवीन नियम केलेला आहे. आयपीएलच्या मध्यंतरानंतर कोणत्या संघाला दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या संघात घेता येणार आहे. पण त्यासाठी त्या खेळाडूने संघासाठी दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळलेले असावेत. सध्याच्या घडीला अजिंक्य आणि गेल हे आपल्या संघांकडून एकही सामने खेळेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना चेन्नईचा संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

वाचा-

सध्याच्या घडीला चेन्नईला आतापर्यंत चांगली सलामी मिळालेली नाही. कारण मुरली विजय हा आतापर्यंत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी अजिंक्य हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे अजिंक्य चेन्नईच्या संघातून खेळण्याची शक्यता जास्त आहे. चेन्नईच्या संघातील परदेशी खेळाडूंचा कोटा भरलेला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ गेलपेक्षा अजिंक्यलाच आपल्या ताफ्यात सामील करण्याचा विचार करेल. पण सध्याच्या घडीला चेन्नईसाठी अजिंक्य हा सर्वात चांगला पर्याय असल्याचे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

1 COMMENT

  1. Your writing is perfect and complete. casinosite However, I think it will be more wonderful if your post includes additional topics that I am thinking of. I have a lot of posts on my site similar to your topic. Would you like to visit once?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here