दुबई: आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ यावर्षी मात्र अडचणीत आहे. चार पैकी ३ सामन्यात पराभव झाल्याने चेन्नई गुणतक्त्यात सर्वात अखेरच्या क्रमांकावर आहे. आज चेन्नईची लढत विरुद्ध होत आहे.

वाचा-
पंजाबविरुद्ध धोनीचा संघ अधिक दबावात असणार आहे. संघात बदल अपेक्षित आहेत. पण चेन्नईकडे फार पर्याय देखील नाहीत. ड्वेन ब्राव्होच्या जागी इमरान ताहिरला संधी मिळू शकते. तसेच केदार जाधवसाठी देखील धोनीला पर्याय शोधावा लागले.

वाचा-
पंजाबविरुद्ध शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस डावाची सुरूवात करतील. त्यानंतर अंबाती रायडू, केदार जाधव, सॅम करन आणि धोनीला जबाबदारी घ्यावी लागले. प्रथम फलंदाजी घेतली तर मोठी धावसंख्या उभी करावी लागेल तर दुसऱ्यांचा फलंदाजी करण्याची वेळ आली तर धावांचा वेग वाढवावा लागले.

वाचा-

पंजाबचा संघ तुलनेत संतुलित आहे. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल ही सलामीची यशस्वी जोडी ठरली आहे. त्यानंतर करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन सारखे मोठे शॉट मारणारे खेळाडू आहेत.

वाचा-

धोनीवर सर्वांची नजर…

आजच्या सामन्यात सर्वांची नजर धोनीवर असणार आहे. गेल्या चार सामन्यात धोनीला फार विशेष कामगिरी करता आली नाही. सर्वोत्तम फिनिशर असलेला अपयशी ठरला आहे. त्यामुळेच लोक त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हैदराबादविरुद्ध धोनीच्या फलंदाजीसोबत फिटनेसवर देखील चर्चा सुरू झाली.

संभाव्य संघ

चेन्नई– शेन वॉट्सन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, दीपक चाहर, पीयुष चावला, शार्दुल ठाकूर

पंजाब– केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), मयांक अग्रवाल, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, जिमी निशम, सरफराज खान, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डेन कॉर्टेल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

22 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here