चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला एक चिंता अजूनही सतावते आहे. त्यामुळेच त्यांची कामगिरी चांगली होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळेच चेन्नईचा संघ सध्याच्या घडीला गुतालिकेत तळाला दिसत आहे. चेन्नईला नेमकी कोणती चिंता सतावते आहे, पाहा…

सध्याच्या घडीला चेन्नईला पराभवाची हॅट्रिक स्वीकारावी लागली आहे. कारण गेल्या तीन सामन्यांमध्ये चेन्नईला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. पण संघाची ही चिंता जर कमी झाली तर नक्कीच चेन्नईचा संघ विजय मिळवू शकतो, असे म्हटले जात आहे.

चेन्नईच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणार आहे, पण त्यांना अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सध्याच्या घडीला चेन्नईला चिंता सतावते आहे ती सलामीच्या जोडीची. कारण आतापर्यंत चेन्नईला एकाही सामन्याच चांगली सलामी मिळाल्याचे पाहायला मिळालेले नाही. त्यामुळेच चेन्नईच्या संघाने मुरली विजयला डच्चू दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस हे दोघे चेन्नईसाठी सलामीला येताना दिसत आहेत.

वॉटसन हा अनुभवी क्रिकेटपटू असला तरी अजूनही त्याला सूर गवसलेला दिसत नाही. कारण आतापर्यंतच्या चारही सामन्यांमध्ये त्याला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. फॅफने मधल्या फळीत येऊन चांगली कामगिरी केली होती. पण आता त्याच्यावर सलामीवीराची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे तो या स्थानाला कसा न्याय देतो, हे पाहणे महत्वाचे असेल.

जर चेन्नईच्या संघाला आजच्या सामन्यात चांगली सलामी मिळाली, तर नक्कीच त्यांची ही चिंता दूर होईल. त्याचबरोबर त्यांना विजयाच्या जवळही पोहोचता येईल. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांचे लक्ष सध्याच्या घडीला वॉटसन आणि फॅफ या सलामीच्या जोडीकडे नक्कीच असेल.

आजच्या पहिल्या सामन्यात काय झाले पाहा…
2020आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा (
vs
) ३४ धावांनी पराभव केला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २०८ धावा केल्या होत्या. पण हैदराबादला २० षटकात ७ बाद १७४ पर्यंत मजल मारता आली. सामना हैदराबादच्या बाजूने होता पण इशान किशनने कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा अफलातून कॅच घेत मॅच मुंबईच्या बाजूने फिरवली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here