शारजा: IPL 2020आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा ( vs ) ३४ धावांनी पराभव केला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. मुंबईने प्रथम फलंदाजी करत २०८ धावा केल्या होत्या. पण हैदराबादला २० षटकात ७ बाद १७४ पर्यंत मजल मारता आली. सामना हैदराबादच्या बाजूने होता पण इशान किशनने कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा अफलातून कॅच घेत मॅच मुंबईच्या बाजूने फिरवली.

वाचा-

मुंबईने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. पण ट्रेंट बोल्टने धोकायक जॉनी बेयरस्ट्रोला २५ धावांवर बाद करत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांड्या यांनी धावांची गती कमी न करता संघाला सुस्थितीत नेले. मनिष पांड्या ३० धावांवर बाद झाला. त्यानंतर केन विलियमसन ३ तर प्रियम गर्ग ८ धावा करून बाद झाला. या दोन विकेटमुळे सामना थोडा फार मुंबईच्या बाजूने झुकला.

वाचा-
१६व्या षटकात इशान किशनने वॉर्नरचा अफलातून कॅच घेत मुंबईला मोठे यश मिळून दिले. (
) अखेरच्या १८ चेंडूत हैदराबादला ५१ धावांची गरज होती. पण मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि धावा वाचवल्या. १९व्या षटकात जसप्रीत बुमराहने २ विकेट घेत विजय पक्का केला.

सचिनने केले कौतुक

वाचा-
त्याआधी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच षटकात तो ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादव देखील फार मोठी खेळी न करता बाद झाला. २ बाद ४८ अशी अवस्था असताना डी कॉक आणि इशान किशन यांनी मुंबईला १२६ पर्यंत पोहोचवले. इशान किशन ३१ धावांवर बाद झाल्यानंतर डी कॉकने अर्धशतक पूर्ण केले. तो ६७ धावांवर बाद झाला. गेल्या सामन्यात अखेरच्या ५ ओव्हरमध्ये ८९ धावा करणारे मुंबईचे पोलार्ड आणि हार्दिक पंड्या हे दोन खेळाडू मैदानात होते. या दोघांनी संघाला २००च्या जवळ पोहोचवले. हार्दिक २०व्या षटकात बाद झाला. त्यानंतर क्रुणाल पंड्याने शेवटच्या चार चेंडूवर २० धावा करत मुंबईला २०८ पर्यंत मजल मारून दिली.

हैदराबादकडून संदीप शर्मा आणि कैलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. राशीद खानने ४ षटकात २२ धावा देत १ विकेट घेतली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here