दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकल्यावर दोन्ही संघांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. पण सध्याच्या घडीला तरी दिल्लीच्या संघाला एक धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीला नेमका कोणता धक्का बसला आहे, पाहा…
दिल्लीचा संघ दमदार कामगिरी करत होता. पण आता दिल्लीच्या संघातील अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिश्राच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करता येत नाही आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मिश्रा खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
अमित मिश्राच्या हाताला दुखापत झाली झालेली आहे. पण त्याच्या या दुखापतीचा अजूनही वैद्यकीय अहवाल आलेला नाही. त्यामुळे त्याच्याबाबत संघाने अजूनही अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. पण मिश्राला जर दुखापत झाली असेल आणि त्याला जर गोलंदाजी करता येत नसेल, तर ही गोष्ट गंभीर आहे. त्यामुळे संघाला मिश्राबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय अहवालाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तरी मिश्रा आपल्याला दिसणार नसल्याचेच म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times