2020: आज आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सबरोबर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली हा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला जे जमले नाही ते विराट या सामन्यात करू शकतो, असे म्हटले जात आहे. भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर होऊ शकतो. त्याचबरोबर विराटच्या नावावर अजून ही विक्रम या सामन्यात होऊ शकतात.

गेल्या सामन्यात विराटने धडाकेबाज अर्धशतक साजरे केले होते. त्याचबरोबर आयपीएलमधील ५५०० धावाही पूर्ण करण्याचा विक्रम नोंदवला होता. पण आजच्या सामन्यात कोहली हा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराटला इतिहास रचण्यासाठी किती धावांची गरज आहे, ते पाहा…

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात जर विराटने १० धावा केल्या, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. कोहली चांगल्या फॉर्मात असून आजच्या सामन्यात तो हा विक्रम रचेल, असे म्हटले जात आहे. कोहली सध्याच्या घडीला २७० ट्वेन्टी-२० सामने खेळला असून त्याच्या नावावर ८९९० धावा आहेत.

कोहलीला षटकारांचे द्वशतक झळकावण्याची संधी
कोहलीला या सामन्यात २०० षटकार पूर्ण करण्याचीही संधी असेल. कारण सध्या विराटच्या नावावर आयपीएलमधील १९२ षटकार आहे. त्यामुळे या सामन्यात आठ षटकार लगावल्यास कोहली षटकारांचे अर्धशतक पूर्ण करू शकतो. षटकारांचे द्विशतक पूर्ण करणारा कोहली हा भारताचा चौथा फलंदाज ठरणार आहे. कारण यापूर्वी रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केलेली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here