पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंतचा मोठा विजय मिळवला होता. या विजयानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवरील टीका कमी झाली आहे. पण त्याचवेळी धोनीची पत्नी साक्षीची एक पोस्ट आता चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये साक्षीने नेमकं काय म्हटलं आहे, पाहा…

चेन्नईच्या विजयानंतर साक्षी धोनीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तिने चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांचा फोटोंचा वापर केला आहे. या फोटोखाली साक्षीने म्हटलं आहे की, हे दोघे आता काही थांबणारे नाहीत.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या सलामीवीरांना पहिल्यांच सूर गवसलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या दोन्ही सलामीवीरांच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने पंजाबवर मोठा विजय साकारला. या सामन्यातून चेन्नईचा नाद करायचा नाही, असंच या दोन्ही सलामीवीरांनी अन्य संघाला दाखवून दिले आहे. फॅफने यावेळी ५३ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८७ धावांची खेळी साकारली, तर वॉटसनने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ८३ धावा केल्या.

पंजाबच्या १७९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने भन्नाट सुरुवात केली. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी अर्धशतके साजरी केली आणि संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये चेन्नईचा चांगली सलामी मिळालेली नव्हती. पण या सामन्यात पहिल्यांदाच चेन्नईला शतकी सलामी मिळाल्याचे पाहायला मिळाले. वॉटसन आणि फॅफ यांनी चांगली रणनिती आखत पंजाबच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here