दुबई, : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चूक घडलेली पाहायला मिळाली. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. पण ही चूक केल्यावर कोहलीने नेमके काय केले, पाहा…

दिल्लीविरुद्धच्या सामन्यामध्ये कोहलीकडे एकदा चेंडू आला होता. आता करोनानंतर क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास खेळाडूला मोठी शिक्षा होऊ शकते. कोहलीने यावेळी चेंडूला थुंकी लावण्याचा प्रयत्न केला. त्याने एकदा चेंडूला तसा हात लावलाही, पण त्यानंतर त्याच्या हा नवीन नियम लक्षात आला. आपल्याकडून चूक झाल्याचे समजल्यावर कोहलीने पंचांची माफीही मागितल्याचे पाहायला मिळाले आहे.

करोनानंतर क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या नियमांनुसार तुम्ही चेंडूला थुंकी किंवा लाळ लावू शकत नाही. पण कोहलीकडून ही चूक मैदानात झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कोहलीवर आता आयपीएलमध्ये कोणती कारवाई होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले असेल.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात जर विराटने १० धावा केल्या, तर ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावा करणारा कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. कोहली चांगल्या फॉर्मात असून आजच्या सामन्यात तो हा विक्रम रचेल, असे म्हटले जात आहे. कोहली सध्याच्या घडीला २७० ट्वेन्टी-२० सामने खेळला असून त्याच्या नावावर ८९९० धावा आहेत.

कोहलीला षटकारांचे द्वशतक झळकावण्याची संधीकोहलीला या सामन्यात २०० षटकार पूर्ण करण्याचीही संधी असेल. कारण सध्या विराटच्या नावावर आयपीएलमधील १९२ षटकार आहे. त्यामुळे या सामन्यात आठ षटकार लगावल्यास कोहली षटकारांचे अर्धशतक पूर्ण करू शकतो. षटकारांचे द्विशतक पूर्ण करणारा कोहली हा भारताचा चौथा फलंदाज ठरणार आहे. कारण यापूर्वी रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केलेली आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोहली ९ हजार धावांचा पल्ला गाठतो का आणि २०० षटकार पूर्ण करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here