दुबई: DC vs RCB आयपीएलच्या १३व्या हंगामात काल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत झाली. दिल्लीने या सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला आणि ८ गुणांसह गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवले. या सामन्यात दिल्लीचा फिरकीपटू आर. () ने शानदार कमबॅक केले. अश्विन पहिल्या सामन्यात जखमी झाला होता. त्यामुळे काही सामने खेळू शकला नाही. बेंगळुरूविरुद्ध त्याने २६ धावा देत एक विकेट घेतली.

वाचा-
या सामन्यात पुन्हा एकदा अश्विन आणि हा वाद समोर आला. गोलंदाजी करत असताना अश्विनच्या लक्षात आले की एरॉन फिंच नॉन स्ट्रायकर क्रीझ सोडत आहे. पण त्याने फिंचला मांकडिंग केले नाही तर वॉर्निंग दिली आणि सोडून दिले. याआधी अश्विनने २०१९ साली जोस बटलरला अशा पद्धतीने बाद केले होते. तेव्हा त्यावर खुप वाद झाला होता. पण यावर्षी अश्विनने फक्त मैदानावर वॉर्निंग दिली नाही तर सोशल मीडिवरून देखील दम दिला आहे.

वाचा-
मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, ही २०२० मधील पहिली आणि अखेरची वॉर्निंग आहे. हे अधिकृतपणे सांगतोय. नंतर यावरून मला कोणी दोष देऊ नये. या ट्विटमध्ये त्याने फिंच आणि दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांना टॅग करत दोघे मित्र असल्याचे म्हटले आहे. त्याबरोबर #runout #nonstriker हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

वाचा-

सामन्यात जेव्हा अश्विनने फिंचला बाद न करता दुसरा चेंडू टाकण्यास सुरुवात केली तेव्हा डगआउटमध्ये बसलेले दिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंगला हसू आवरता आले नाही. IPL 2020ची सुरूवात होण्याआधी पॉन्टिंगने गोलंदाजाने मांकडिंग करण्याआधी फलंदाजाला वॉर्निंग द्यावी. कालच्या सामन्यात अश्विनने नेमके तेच केले. २०१९ मध्ये मांकडिंगवरून त्याच्यावर खुप टीका झाली होती.

वाचा-

पाहा व्हिडिओ-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here