फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने टाकलेला चेंडू पंतच्या डोक्याला लागला. कमिन्सने टाकलेला बाऊंसर चेंडू पंतच्या हेल्मेटला लागला आणि तो बाद झाला. पंतला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. रात्रभर त्याच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट घेतली जात असल्याचे बीसीसीआयने बुधवारी सकाळी सांगितले. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्या प्रकृती संदर्भातील अपडेट दिले होते.
पाहा-
पंत आज भारतीय संघाच्या अन्य सदस्यांसोबत राजकोटला जाणार नाही. सर्व सामान्यपणे ज्या खेळाडूच्या डोक्यावर चेंडू लागतो त्याला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. पंत काही दिवसांनी भारतीय संघासोबत असेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. बीसीसीआयने पंत पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल का किंवा त्याला विश्रांती देण्यात आली आहे यासंदर्भात काहीच सांगितले नाही.
वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ४४व्या षटकात चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला होता आणि तो बाद देखील झाला. त्यानंतर भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणादरम्यान पंतच्या ऐवजी राहुलने विकेटकिपिंग केली होती.
ऑस्ट्रेलिया संघाने यजमान भारतीय संघाचा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात १० विकेटनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात डेव्हिड वॉर्नरने ११२ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद १२८ धावा केल्या. तर कर्णधार अॅरॉन फिंचने ११४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ११० धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी २५६ धावांचे लक्ष्य पार केले. एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७४ चेंडूत आणि १० विकेट राखून विजय मिळवला.
वाचा-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News
This post is very simple to read and appreciate without leaving any details out. Great work!
okbet jackpot