वाचा-
अक्षरने एरॉन फिंच आणि मोइन अलीची विकेट घेतली. त्याने चार षटकात फक्त १८ धावा देत दोन विकेट घेतल्या. सामना झाल्यानंतर अक्षरला पुरस्कार देण्यात आला. यावेळी तो हिंदीत बोलत होता आणि दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर ( ) त्याचा भाषांतरकार म्हणून सोबत होता.
वाचा-
स्वत:च्या कामगिरीबद्दल बोलताना अक्षर म्हणाला, जशी पहिली बॅटिंग झाली तेव्हा लक्षात आले की चेंडू थांबून येत आहे. याची जाणीव होती की पॉवर प्ले मध्ये मला गोंलदाजी करावी लागणार, त्यानुसार सराव देखील केला होता. त्यानुसार अपेक्षित निकाल देखील मिळाला.
वाचा-
अक्षरची ही प्रतिक्रिया श्रेयसने इंग्रजीमध्ये बोलून दाखवली. पण शेवटी त्याने एक वाक्य अधिकचे जोडले. तो म्हणाला, त्याच बरोबर मी कर्णधाराचे आभार मानतो.
श्रेयस हे वाक्य ऐकल्यानंतर तिघांना हसू आवरता आले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times