अबुधाबी, : आजच्या दिवसाचा एक अजब योगायोग पाहायला मिळत आहे. आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगणार आहे. पण आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आजचा दिवस मुंबईसाठी की असल्याचे म्हटले जात आहे. पण आज होणाऱ्या सामन्यातही मुंबई राजस्थानला पराभूत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागेलेले असेल.

सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंबई आणि राजस्थान यांच्यामध्ये चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेतील अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने राजस्थानला ३३ धावांनी पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली होती. हा मुंबई इंडियन्सचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा शेवटचा सामना होता. त्यामुळे सचिनचा मुंबई इंडियन्सबरोबरचा एक खेळाडू म्हणून शेवट गोड झाला होता.

मुंबई इंडियन्सने आज ही आठवण आपल्या चाहत्यांसाठी शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सने याबाबत ट्विट्स केले आहेत. यामध्ये आजच्या दिवशी मुंबईने राजस्थानला कसे पराभूत केले, तेदेखील सांगितले आहे. त्याचबरोबर या आठवणींचे काही फोटोही मुंबई इंडियन्सने शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांना मुंबईच्या या ट्विटला चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांनी स्पर्धे आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या लढतीत देखील चुरस पाहायला मिळू शकते. 2020आयपीएलमध्ये आजची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( vs Rajasthan Royals) यांच्यात होत आहे. अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या दोघामधील ही पहिली लढत आहे. तर दुसरी लढत २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दोन्ही संघातील अखेरचे पाच सामने– राजस्थानचा ५ विकेटनी विजय
– राजस्थानचा ४ विकेटनी विजय
– राजस्थानचा ७ विकेटनी विजय
– राजस्थानचा ३ विकेटनी विजय
– मुंबई इंडियन्सचा ८ धावांनी विजय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here