आबुधाबी, : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आजचा सामना रंगणार आहे. पण मुंबई आणि राजस्थान यांच्यामध्ये गेल्या पाच सामन्यांमध्ये नेमके काय झाले, कोणत्या संघाने बाजी मारली आणि कोणाचे पारडे जड राहिले होते. पाहा…

मुंबई आणि राजस्थान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. पण गेल्या पाच लढतींमध्ये मुंबईपेक्षा राजस्थानचे पारडे नक्कीच जड असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या पाच सामन्यांमध्ये राजस्थानने मुंबईवर तब्बल चार वेळा विजय मिळवता आला आहे, तर मुंबईला फक्त एकाच विजयावर समाधान मावाले लागले आहे.

राजस्थानने मुंबईवरील हे विजय धावांचा पाठलाग करतानाच मिळवल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण राजस्थानने मुंबईवर सर्वात मोठा विजय हा सात विकेट्स राखून मिळवलेला होता. त्याचबरोबर चारही लढतींमध्ये मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करूनच राजस्थानचा संघ जिंकल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबईने जो राजस्थानवर एकमेव विजय मिळवला आहे, तोदेखील धावांचा पाठलाग करूनच मिळवल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी धावांचा पाठलाग करणे हिताचे ठरलेले आहे. पण आजच्या सामन्यात नेमकं काय होणार, याची चाहत्यांना उत्सुकता असेल.

दोन्ही संघातील अखेरचे पाच सामने– राजस्थानचा ५ विकेटनी विजय
– राजस्थानचा ४ विकेटनी विजय
– राजस्थानचा ७ विकेटनी विजय
– राजस्थानचा ३ विकेटनी विजय
– मुंबई इंडियन्सचा ८ धावांनी विजय

या वर्षी दोन्ही संघांची कामगिरी शानदार झाली आहे. कामगिरीचा विचार करता राजस्थान रॉयल्सचे पारडे जड वाटत आहे. पण शारजामधील पहिल्या दोन लढतीत धमाकेदार फलंदाजी केल्यानंतर दुबई आणि अबुधाबीमध्ये राजस्थानची कामगिरी निराशजनक झाली आहे. यामुळेच राजस्थान या सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे. या उलट मुंबई इंडियन्सची कामगिरी या दोन मैदानावर चांगली झाली आहे.

संभाव्य संघमुंबई इंडियन्स- क्विंटन डी कॉक(विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, क्रुणार पंड्या, किरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिनसन, राहुल चाहर, जसप्रित बुमराह

राजस्थान रॉयल्स – जोस बटरल (विकेटकिपर), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, रियान पराग, टॉम करन, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उडानकट अथवा अंकित राजपूत

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here