आबुधाबी, : मुंबईचा सूर्यकुमार यादव आजच्या सामन्यात तळपल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबईला राजस्थानपुढे १९४ धावांचे आव्हान ठेवता आले.

मुंबईने यावेळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी यावेळी ४९ धावांची सलामी दिली. पण राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या कार्तिक त्यागीने यावेळी आपल्या पहिल्याच षटकात डीकॉकला बाद केले. त्यागी पाचवे षटक टाकत असताना तिसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माने त्याला षटकार लगावला. पण त्यानंतरही त्यागी बिथरला नाही. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मुंबईचा सलामीवीर डीकॉकला बाद केले आणि आपल्या संघाला पहिले यशही मिळवून दिले. डीकॉकने यावेळी १५ चेंडूंत २३ धावा केल्या.

डीकॉक बाद झाल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी चांगली रंगली. रोहित यावेळी अर्धशतक झळकावत विक्रम रचेल, असे वाटत होते. पण श्रेयस गोपाळने रोहितला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. रोहितने २३ चेंडूंत ३५ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर मुंबईचा इशान किशनही बाद झाला. त्यामुळे मुंबईला आता सलग दोन धक्के बसले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कृणाल पंड्यालाही चांगली खेळी साकारता आली नाही. कृणालला १२ धावा करता आल्या.

एकिकडे मुंबईचे फलंदाज बाद होत असताना मात्र सूर्यकुमार यादवने संयत खेळ करत संघाचा धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्याचबरोबर सूर्यकुमारने यावेळी आयपीएलमधील आठवे अर्धशतकही पूर्ण केले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here