दुबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१९साठीचे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारात विराटला स्पिरीट ऑफ क्रिकेट हा पुरस्कार जाहीर झाला. त्याच बरोबर आयसीसीने विराटच्या नेतृत्वगुणाचा सन्मान केला आहे. आयसीसीने वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद विराटकडे सोपवले आहे.

विराटने २०१९मध्ये वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी विराटने कसोटी क्रिकेटमधील सातवे द्विशतक झळकावले होते. विराटने ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २५४ धावा केल्या होत्या. कसोटी संघात विराट सोबत भारताचा सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाल याला देखील स्थान देण्यात आले आहे. मयांकने दोन द्विशतक, एक शतक आणि दोन अर्धशतक केली आहेत. बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबरमध्ये झालेल्या कसोटीत मयांकने २४३ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.

वाचा-

वनडे संघात विराटसह हिटमॅन रोहित शर्मा, जलद गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना स्थान दिले आहे. रोहितने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० शतक केली होती. यातील पाच शतक त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत केली आहेत. कुलदीपने २०१९ मध्ये दोन हॅटट्रिक घेतली. तर जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत शमीने २०१९मध्ये भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजाची जबाबदारी पार पाडली होती. शमीने गेल्या वर्षी २१ वनडे सामन्यात ४२ विकेट घेतल्या. शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.

वाचा-

आयसीसीचा वनडे संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, कॅरी होप, बाबर अजम, केन विल्यमसन, बेन स्ट्रोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

आयसीसीचा कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, टॉम लाथम, मार्नस लबूशेन, स्टिव्ह स्मिथ, बेन स्ट्रोक्स, पॅट कमिन्स, वॉटलिंग, वाग्नर आणि नाथन लियोन

वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here