या सामन्यापूर्वी मुंबईचा संघ हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होता. यापूर्वी मुंबईच्या संघाने पाच सामने खेळलेले होते. या पाच सामन्यांमध्ये मुंबईने तीन विजय मिळवलेले होते, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला होता. यापूर्वी तीन विजयांसह मुंबईचा संघ सहा गुणांवर आहे. त्यामुळे हा सामना जर मुंबईने जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी होती आणि तसेच पाहायला मिळाले. कारण हा सामना जिंकल्यावर मुंबईच्या संघाचे ८ गुण झाले. त्याचबरोबर त्यांचा रनरेट चांगला असल्यामुळे त्यांना अव्वल स्थान पटकावता आले आहे. मुंबईच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला खाली खेचत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ आपले अव्वल स्थान किती काळापर्यंत टिकवतो, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
राजस्थानचा संघ हा यापूर्वी पाचव्या स्थानावर होता. कारण यापूर्वी चार सामन्यांमध्ये राजस्थानला दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होते तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे राजस्थानचे या सामन्यापूर्वी चार गुण होते. त्यामुळे हा सामना जिंकून राजस्थानच्या संघाचे सहा गुण होऊ शकले असते. पण आजच्या सामन्यात त्यांना मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राजस्थानच्या संघाची सातव्या स्थानावर घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
सध्याच्या घडीला मुंबईचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ यावेळी आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा संघ आहे. त्यानंतर गुणतालिकेत चौथे स्थान हे केकेआरच्या संघाने पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सचा संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर राजस्थानचा संघ सातव्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ आठव्या स्थानवर आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times