अबुधाबी: आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी पहिले दोन सामने कमालीचे चांगले ठरले. पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांनी २०० हून अधिक धावा केल्या आणि विजय देखील मिळवला. पण त्यानंतरच्या सामन्यात राजस्थानला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. काल विरुद्ध () त्यांचा ५७ धावांनी पराभव झाला. राजस्थानचा हा सलग तिसरा पराभव ठरला आणि ते गुणतक्त्यात ७व्या क्रमांकावर फेकले गेले.

वाचा-

राजस्थानचा पराभव झाला पण आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार () ला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. राजस्थानने धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने हा दंड केला गेला आहे. त्यानी निर्धारित केलेल्या वेळेत २० षटक न टाकल्याने हा दंड केला गेलाय.

वाचा-

आयपीएल मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथवर मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने दंड करण्यात आला आहे.

वाचा-
याआधी आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर यांना देखील अशा प्रकारचा दंड झाला आहे.

वाचा-
काल अबुधाबीत झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत १९३ धावा केल्या होत्या. मुंबईकडून सुर्यकुमार यादवने ७९ धावांची खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्डने राजस्थानच्या फलंदाजांना नाचवले. जोस बटलर वगळता राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यांचा डाव १९व्या षटकात १३६ वर संपुष्ठात आला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here