वाचा-
गुणतक्त्यात कोलकाता चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह चौथ्या स्थानावर तर चेन्नई पाच सामन्यात दोन विजय आणि ३ पराभवासह पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या म्हणजे पंजाब विरुद्धच्या सामन्यातील त्यांची कामगिरी होय. पंजाबविरुद्ध चेन्नईने ३ पराभवानंतर शानदार कमबॅक केला आणि १० विकेटनी विजय मिळवला. त्यामुळे कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकसाठी चेन्नईविरुद्धचा सामना अग्निपरीक्षा ठरणार आहे.
वाचा-
कार्तिकला आतापर्यंत कर्णधार आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करता आली नाही. कोलकाता संघाने इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयोन मॉर्गनला विकत घेतले होते. पण कर्णधारपद कार्तिककडे ठेवले आहे. कार्तिकने चार सामन्यात फक्त ३७ धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याचे काही निर्णय घेतली चुकले आहेत. तो मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांच्या आधी फलंदाजीला येत आहे. तर बॅग बॅश मध्ये चांगली फलंदाजी करणारा टॉम बेंटनच्या ऐवजी सुनील नरेनला सलामीला पाठवले जात आहे. बेंटनची तुलना केव्हिन पिटरसनशी केली जात आहे. नरेनने चार सामन्यात फक्त २७ धावा केल्या आहेत.
वाचा-
कोलकाताकडे चांगले गोलंदाज आहेत पण त्यांचा योग्य वापर कार्तिकला करता आला नाही. त्यातच पॅट कमिन्स खराब फॉर्ममध्ये असल्याने कोलकाताची काळजी आणखी वाढली आहे. शारजामध्ये त्यांनी २०० धावा केल्या होत्या. पण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये त्यांना खेळता आले नाही.
वाचा-
दुसऱ्या बाजूला चेन्नई संघाने सलग ३ पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध धमाकेदार कमबॅक केला. शेन वॉट्सन आणि फाफ डुप्लेसिस यांनी नाबाद भागिदारी करत विजय मिळवला. आता या सामन्यात विजय मिळवून धोनीला गुणतक्त्यात पहिल्या ४ संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. या सामन्यात धोनी ब्राव्होच्या ऐवजी इमरान ताहीरला संधी देऊ शकतो.
संभाव्य संघ
चेन्नई- शेन वॉट्सन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, पियुष चावला
कोलकाता- सुनील नरेन, शुभमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक(कर्णधार आणि विकेटकिपर), इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी, पॅट कमिंन्स, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुन चक्रवर्ती
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times