याआधी आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोलकाता नाइट रायडर्स संघाने अली खानला जखमी हॅरी गर्नीच्या जागी संघात घेतले होते. आयपीएलच्या कोणत्याही संघात सहभागी झालेला तो पहिला अमेरिकन खेळाडू ठरला होता. पण आता अली जखमी झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही.
अलीने याआधी कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने सीपीएलचा विजेता त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचा मालक देखील शाहरुख खान आहे. सीपीएलमध्ये अलीने ८ सामन्यात ८ विकेट घेतल्या होत्या. त्याची सरासरी ७.४३ इतकी होती.
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार अली जखमी झाला असला तरी तो आयपीएलमधून बाहेर झाला नाही. अलीची दुखापत फार गंभीर नाही. सीपीएलमध्ये देखील त्याला दुखापतीचा त्रास होत होता. अली सध्या दुखापतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, असे क्रिकइंन्फोने म्हटले आहे. तो संघा सोबत ट्रेनिंग आणि नेट्समध्ये गोलंदाजी करत असल्याचे समजते.
दुखापतीमुळे एखाद्या खेळाडूने आयपीएलमधून बाहेर रोहण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील हैदराबादकडून खेळणारा मिचेल मार्श आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार यांनी दुखापतीमुळे माघार घेतली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times