आबुधाबी: भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला आतापर्यंत एकही संधी दिल्ली कॅपिटल्सकडून मिळालेली नाही. त्यामुळे आता अजिंक्य रहाणे दिल्लीचा संघ सोडणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला पाहायला मिळत आहे. याबाबत संघातील एका अधिकाऱ्यांनी याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या अधिकाऱ्यांचे वक्तव्य ऐकले तर अजिंक्यला सध्याच्या घडीला दुसऱ्या संघात जाण्याचा पर्याय खुला आहे, असेच दिसते आहे.

अजिंक्य रहाणेबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले की, ” दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन हे चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच सध्याच्या घडीला संघ व्यवस्थापन विश्वास ठेवत आहे.”

याबाबत या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” सोशल मीडियावर जे काही सांगण्यात येते, त्यानुसार संघाची निवड करण्यात येत नाही. अजिंक्य रहाणे हा एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे क्रिकेटचा चांगला अनुभवही आहे. पण सध्याच्या घडीला पृथ्वी आणि शिखर हे सलामीवीराची भूमिका उत्तम बजावताना दिसत आहेत. जे चांगलं सुरु आहे ते बदलण्याचा विचार कोणीही करत नाही. पृथ्वी आणि शिखर यांनी आतापर्यंत आपल्याला सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे अजिंक्यला जर संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला काही काळ नक्कीच वाट पाहावी लागणार आहे.”

आयपीएलमध्ये सध्याच्या घडीला एक नवीन नियम आला आहे. त्यानुसार अजिंक्यला दुसरा एखादा संघही आपल्या ताफ्तात सामील करून घेऊ शकतो. पण तोपर्यंत आयपीएलच्या मध्यांतरापर्यंत त्याला वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच त्याचा दुसऱ्या संघातून खेळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे अजिंक्यला कोणता संघ आपल्या ताफ्यात दाखल करणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

हा नवीन नियम नेमका आहे तरी काय, पाहा…आता स्पर्धा मध्यावर पोहोचली असताना मिड सीजन ट्रान्सफरची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलमध्ये मिड सीजन ट्रान्सफर ( Mid -Season Transfer)साठी काही नियम तयार केले आहेत. या नियमानुसार निश्चित केलेल्या खेळाडूंना दुसऱ्या संघाकडे ट्रान्सफर केले जाऊ शकते. यासाठीची पहिली अट म्हणजे आयपीएलमधील सर्व आठ संघांनी त्यांचे किमान प्रत्येकी ७ सामने खेळले पाहिजे. तसेच हा नियम अशा खेळाडूंना लागू होईल ज्यांनी त्यांच्या संघाकडून दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळले आहेत. अशा खेळाडू मिड ट्रान्सफरमध्ये भाग घेऊ शकतील.

(याबाबतचे वृत्त टाइम्स नाऊ या संकेतस्थळाने दिलेले आहे.)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here