जडेजाने आतापर्यंत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. पण जडेजा हा एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे आणि ही गोष्ट आज पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळाली. या सामन्यात जडेजाने हवेत उडी मारुन झेल टिपला आणि कोलकात्याच्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवल्याचे पाहायला मिळाले आहे.
या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघात यावेळी फिरकीपटू कर्ण शर्माला संधी देण्यात आली होती. कर्णच्याच गोलंदाजीवर यावेळी जडेजाने हा अप्रतिम झेल टिपल्याचे पाहायला मिळाले आहे. जडेजाने हा सुंदर झेल पकडत कोलकात्याच्या नितीश राणाला बाद केले. यावेळी राणाला ९ धावा करता आल्या.
कोलकात्याच्या डावाची यावेळी चांगली सुरुवात झाली नाही. कारण त्यांना सलामीवीर शुभमन गिल आणि नितीष राणा यांना लवकर गमवावे लागले. गुलने यावेळी ११ धावा केल्या, तर राणाला ९ धावा करता आल्या. पण कोलकाताचे हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले असले तरी त्यांची ही कसर राहुल त्रिपाठीने भरून काढली. कारण या सामन्यात पहिल्यांदाच राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवण्यात आले होते. राहुलने या संधीचे सोने करत अर्धशतक झळकावल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे कोलकात्याच्या राहुलने आजचा दिवस गाजवला,असे चाहते म्हणत होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times