वाचा-
पंजाबची जमेची बाजू म्हणजे त्यांची सलामीची जोडी होय. कर्णधार केएल राहुल शानदार फलंदाजी करत आहे. त्याने दोन अर्धशतक आणि एक शतक झळकावले आहे. त्याच्या जोडीला मयांक अग्रवालने देखील प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतक केले आहे. त्यानंतर निकोलस पूरनने देखील चांगली फलंदाजी केली. ग्लेन मॅक्सवेलला मात्र अद्याप सूर गवसलेला नाही. चांगल्या फलंदाजीनंतर देखील पंजाबला खराब गोलंदाजीमुळे विजय मिळवता आला नाही. पंजाबच्या प्रत्येक पराभवानंतर चाहते ख्रिस गेलला का संधी दिली जात नाही हा प्रश्न विचारत आहे. त्यामुळे या सामन्यात त्याला संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वाचा-
गोलंदाजीत मोहम्मद शमी वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. राजस्थानविरुद्ध २२३ धावा करून देखील पंजाबला विजय मिळवता आला नाही. तर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध १७८ धावांचे लक्ष्य देऊन त्यांनी १० विकेटनी विजय मिळवला.
या पार्श्वभूमीवर आज पंजाबचा संघ हैदराबादविरुद्ध लढत आहे. हैदराबादकडे जॉनी बेयरस्टो, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे आणि केन विलियमसन सारखे फलंदाज आहेत. हे सर्व जण पंजाबच्या गोलंदाजीचा फायदा घेऊ शकतात.
वाचा-
दुसरीकडे हैदराबादचा गेल्या सामन्यात मुंबईकडून ३४ धावांनी पराभव झाला होता. मधळ्याफळीत खराब कामगिरी झाली म्हणून त्यांनी पहिले दोन सामने गमावले होते. त्यानंतर संघात विलियमसनला जागा दिली. पण संघातील मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यामुळे स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे हैदराबादचा गोलंदाजीतील आक्रमपणा कमी झालाय. मुंबईविरुद्ध विलियमसनला गोलंदाजी करावी लागली होती. या सामन्यात नटराजन आणि राशिद खान यांच्यावर अधिक दबाव असेल.
संभाव्य संघ
हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विलियमसन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी नटराजन
पंजाब- केएल राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, मनदीप सिंह, निकोलस पूरन (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, ख्रिस जॉर्डन, हरप्रीत बरार, शेल्डन कॉर्टेल, मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times