अबुधाबी: IPL 2020 मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कोलकाता नाइट रायडर्सने १० धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नई सुरुवातीपासून मजबूत स्थितीत होती. तरी अखेरच्या काही षटकात कोलकाताने बाजी मारली.

प्रथम फलंदाजी करत कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने ८१ धावा केल्या आणि कोलकाताला १६८ धावांचे लक्ष्य दिले. चेन्नईकडून शेन वॉट्सन आणि अंबाती रायडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर रायडू ३० आणि वॉट्सन ५० धावांवर बाद झाला. १० षटकात चेन्नईने १ बाद ९० धावा केल्या होत्या. त्यानंतर देखील त्यांनी सामना गमवला.

वाचा-

११ आणि सॅम करन १७ धावा करून बाद झाल्यानंतर देखील सामना चेन्नईच्या हातात होता. तेव्हा मैदानावर आणि रविंद्र जडेजा होते. केदारने १२ चेंडूत फक्त ७ धावा केल्या. अखेरच्या षटकात रविंद्र जडेजाने मोठे शॉट खेळले पण तोपर्यंत सामना हातातून गेला होता. जडेजाने ८ चेंडूत २१ धावा केल्या.

चेन्नईने जिंकणारा सामना गमावला. याचा राग सामना झाल्यानंतर कर्णधार धोनीच्या बोलण्यातून जाणवला. मधल्या काही ओव्हरमध्ये त्यांनी दोन-तीन षटके चांगली गोलंदाजी केली. आम्ही तेव्हा विकेट गमावल्या. जर आम्ही चांगली फलंदाजी केली असती तर निकाल वेगळा लागला असता. कर्ण शर्माने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे कोलकाताला १६७ धावांवर रोखता आले.

वाचा-

पण अखेरच्या षटकाचा अपवाद वगळता आम्ही चौकार मारले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला काही नव्या गोष्टी करण्याची गरज असते. जर गोलंदाच हळू चेंडू टाकत असेल तर चौकार मारण्यासाठी दुसरे पर्याय शोधले पाहिजेत. पाहा धोनी काय म्हणाला, व्हिडिओ पाहण्यासाठी
.

वाचा-
धोनीचा इशारा सरळ सरळ केदार जाधवकडे होता. चेन्नईला १२ षटकात विजयासाठी ३६ धावांची गरज होती. पण केदार जाधवकडून चौकार किंवा एक, दोन धाव तर सोडाच बॅट देखील बॉलला लागत नव्हता. त्याने ७ चेंडूत फक्त १२ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here