दुबई: युएईमध्ये जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे. करोना व्हायरसमुळे या स्पर्धेत प्रेक्षक उपस्थित नसले तरी संघ मालक आणि काही मोजक्या व्यक्ती मैदानात दिसतात. मॅचमध्ये एखादी महत्त्वाची घटना घडली की कॅमेरा ज्या काही लोकांवर जातो त्यात प्रिती झिंटा, शाहरुख खान, आकाश अंबानी आणि यांच्यावर जातात. यातील पहिली तीन नावे सर्वांना माहित आहेत. पण काव्या मारन हे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत आले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादसाठीचा एक मुख्य चेहरा आहे काव्या मारन…

वाचा-
आयपीएलच्या गेल्या हंगामात काव्या ऑरेंज जर्सीसह डेव्हीड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबाद संघाला पाठिंबा देताना दिसली होती. तेव्हा काव्याबद्दल लोकांना फार कमी माहिती होती. डिसेंबर २०१९ मध्ये जेव्हा २०२० साठी लिलाव सुरू होता तेव्हा हैदराबाद संघासाठी बोली लावताना काव्या दिसली. त्यानंतर युएईमध्ये आयपीएलला सुरूवात झाली तेव्हा काव्या संघाला सपोर्ट करताना अतिशय ग्लॅमरल फॅनगर्ल प्रमाणे उपस्थित असते.

वाचा-
अनेकांना काव्याबद्दल ही माहिती नाही की ती हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. देशातील सर्वात मोठ्या टीव्ही नेटवर्कमध्ये नेटवर्क (ज्यांच्याकडे ३२ टीव्ही आणि ४२ एफएम रेडिओ स्टेशन आहेत) चा समावेश होतो. काव्या क्रिकेट सोबत एफएम रेडिओमध्ये देखील सक्रीय असते. गेल्या वर्षी काव्याला सन टीव्ही नेटवर्कच्या संचालक मंडळात घेण्यात आले होते.

वाचा-
वाचा-
काव्याने चेन्नईमधील स्टेलिया मारिस कॉलेजमधून बी कॉमची पदवी घेतली. तिने सन टीव्ही नेटवर्कमधून इंटर्नशिप केली होती. त्यानंतर न्यूयॉर्कमधील लियोनार्ड अण्ड स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून MBA पूर्ण केले. काव्याने २०१७ नंतर सन टीव्ही ग्रुपच्या डिजिटल मार्केटला वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. काव्या सन नेटवर्कच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्स्टची प्रमुख आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here