दुबई: मध्ये काल (बुधवारी) कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात चेन्नईच्या चाहत्यांचा व्हिलन ठरला तो ( ) . चेन्नईला अखेर्या ४ षटकात ४० धावांची गरज होती आणि तेव्हा केदार जाधवने धीमी फलंदाजी केली. त्याला ७ चेंडूत फक्त १२ धावा करता आल्या. तर त्याच्या जोडीला असलेल्या रविंद्र जडेजाने ८ चेंडूत २१ धावा केल्या. या सामन्यानंतर चाहत्यांनी केदार जाधवला सोशल मीडियावर ट्रोल केले.

वाचा-
चेन्नईची फलंदाजी सुरू असताना १७व्या षटकात धोनी बाद झाला. त्यानंतर केदार जाधव फलंदाजीला उतरला. त्याने पहिल्या ३ चेंडूत एकही धाव काढली नाही. अखेरच्या ३ षटकात विजयासाठी ३९ धावा हव्या होत्या. १८ व्या षटकात पहिल्या चेंडूवर सॅम करन बाद झाला. त्यानंतर आलेल्या जडेजाने पहिल्या चेंडूवर एक धाव काढली आणि केदारला संधी दिली. त्याने पुन्हा बॉल वाया घालवले. विशेष म्हणजे केदारने मोठे शॉट खेळण्याचे प्रयत्न देखील केले नाहीत. जेव्हा जडेजाने शेवटच्या षटकात मोठे शॉट खेळले तोपर्यंत चेन्नईने सामना गमवला होता.

वाचा-
या सामन्यानंतर चेन्नईचे चाहते केदार जाधववर जाम भडकले आहेत. त्यांनी केदारला संघाबाहेर ठेवण्याची मागणी केली आहे. चाहत्याचे काही मजेशीर ट्विट देखील व्हायरल होत आहेत.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here