नवी दिल्ली: च्या १३व्या हंगामात () च्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष्य आहे. हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे असून त्याचे नेतृत्व एम एस धोनी सारखा कर्णधार करत आहे. स्पर्धेत आतापर्यंत चेन्नईची कामगिरी चांगली झाली नाही. पण चेन्नईचा एक खेळाडू मात्र धमाकेदार फलंदाजी करत आहे.

वाचा-

चेन्नईने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. त्यातील एका सामन्याचा अपवाद वगळता () ने शानदार फलंदाजी केली आहे. चेन्नईने ६ पैकी ४ मध्ये पराभव आणि दोन मध्ये विजय मिळवला आहे. या सहा सामन्यात डुप्लेसिसने ७४.७५च्या सरासरीने २९९ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ३ अर्धशतक केले आहे. नाबाद ८७ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

वाचा-

डुप्लेसिसने आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यावर प्रश्न उपस्थित करता येणार नाही. पण संघात जितके स्टार खेळाडू आहेत. त्यांच्या मानाने डुप्लेसिसचा पगार मात्र फारच कमी आहे. डुप्लेसिसला एक कोटी ६० लाख इतका पगार मिळतो. जो अन्य खेळाडूंपेक्षा फारच कमी आहे.

वाचा-

चेन्नई संघात सर्वात जास्त पगार १५ कोटी धोनीला मिळतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे ज्याला ११ कोटी दिले जातात. अर्थात रैना या वर्षी खेळत नाही. तिसऱ्या क्रमांकावर केदार जाधव आहे. त्याला ७.८ कोटी, रविंद्र जडेजा ७ कोटी, पियुष चावला ६.७५ कोटी, ब्रावोला ६.४ कोटी तर करन शर्मा आणि सॅम करनला प्रत्येकी पाच कोटी तर शेन वॉट्सनला ४ कोटी इतका पगार दिला जातो. या यादीत डुप्लेसिस सर्वात तळाला आहे.

आयपीएलचे खेळाडू आणि त्यांचा पगार
धोनी- १५ कोटी
सुरेश रैना- ११ कोटी
केदार जाधव- ७.८ कोटी
रविंद्र जडेजा- ७ कोटी
पियुष चावला- ६.७५ कोटी
ब्राव्हो- ६.४ कोटी
सॅम करन- ५.५ कोटी
करन शर्मा- ५ कोटी
शेन वॉट्सन-४ कोटी
शार्दुल ठाकूर- २.६ कोटी
अंबाती रायडू- २.२ कोटी
हरभजन सिंग- २ कोटी
मुरली विजय- २ कोटी
फाफ डुप्लेसिस- १.६ कोटी

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here