दुबई: आयपीएल मध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ( ) ६९ धावांनी पराभव केला. पंजाबचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. त्यामुळे त्यांच्या स्पर्धेतील प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. हैदराबादने ६ बाद २०१ धावा केल्या. तर पंजाबला १६.५ षटकात सर्वबाद १३२ पर्यंत मजल मारता आली.

वाचा-

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा वॉर्नर आणि जोडीने धमाकेदार फायदा घेतला. त्यांनी पहिल्या ओव्हरपासूनने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्यांनी १५ षटकात १६० धावसंख्या उभी केली. यात वॉर्नरने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारांसह ५२ धावा तर बेयरस्टोने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९७ धावा केल्या. रवी बिश्नोईने वॉर्नरची १६व्या षटकात विकेट घेतली. त्यानंतर त्याने त्याच ओव्हरमध्ये बेयरस्टोला ९७ धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

वाचा-

१७व्या षटकात पहिल्याच चेंडूवर हैदराबादला तिसरा धक्का बसला. त्यांची अवस्था बिनबाद १६० वरून ३ बाद १६१ अशी झाली. त्यानंतर बिश्नोईने अब्दुल समदला बाद करत हैदराबादची अवस्था ४ बाद १७३ केली. अर्शदीपने प्रियम गर्गला बाद केले. अखेर २० षटकात हैदराबादला ६ बाद २०१ धावा करता आल्या.

वाचा-

पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकात शानदार कमबॅक केले. त्यांनी ४१ धावा देत ६ फलंदाजांना माघारी पाठवले. रवी बिश्नोईने अर्शदीपने दोन तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

वाचा-

पंजाबने अखेरच्या ५ षटकात हैदराबादला रोखले असले तरी त्यांची सुरुवात फार चांगली झाली नाही. मयांक अग्रवाल ९ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर सिमरन सिंग ११ धावांवर बाद झाला. २ बाद ३१ अशी अवस्था असताना राहुल आणि निकोलस पूरन मैदानात होते. तेव्हाच हैदराबादने मोठी विकेट घेतली. कर्णधार केएल राहुल ११ धावांवर बाद झाला.

वाचा-

मोठ्या धावांचा पाठलाग करताना पंजाबने १० षटकात ९६ धावांपर्यंत मजल मारली होती. निकोलस पूरनने चांगली फलंदाजी करत पंजाबला सामन्यात ठेवले होते. पण दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. पूरनने ३७ चेंडूत ७७ धावा केल्या. पंजाबला १६.५ षटकात सर्वबाद १३२ धावा करता आल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here