दुबई: गुरुवारी आयपीएलच्या १३व्या हंगामात झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा ( by 69 runs ) ६९ धावांनी पराभव केला. पंजाबचा हा सलग चौथा पराभव ठरला आहे. तर हैदराबादचा ६ सामन्यातील तिसरा विजय ठरला. या सामन्यानंतर गुणतक्त्यात ( Points Table ) बदल झाला आहे.

वाचा-

पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गुणतक्त्यात ६व्या स्थानावर असेलल्या हैदराबादने ३ऱ्या स्थानावर उडी मारली आहे. तर सामन्याआधी ८व्या स्थानावर असलेला पंजाबचा संघ अद्याप त्याच ठिकाणी आहे.

वाचा-

गुणतक्त्यात मुंबई इंडियन्स ६ पैकी ४ विजयासह अव्वल स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स ५ पैकी ४ विजयासह दुसऱ्या स्थानावर तर हैदराबादने आजच्या विजयासह तिसरे स्थान मिळवले. चौथ्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्स आहेत. त्यांनी ५ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे.

वाचा-

विराट कोहीलचा बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स ५ पैकी ३ विजयांसह पाचव्या, चेन्नई सुपर किंग्ज ६ पैकी २ विजयासह सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स ५ पैकी २ विजयांसह सातव्या तर पंजाब ६ पैकी फक्त एक विजयासह आठव्या स्थानावर आहे.

वाचा-

वाचा-
उद्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. दिल्लीला उद्या पहिले स्थान मिळवण्याची संधी आहे. तर राजस्थानने विजय मिळवल्यास ते पहिल्या चार मध्ये जागा मिळवतील.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here